Wednesday, March 13, 2013

'' फैमिली ड्रामा '' : भावनिक नात्यांची छान गुंफण

Family Drama, Marathi Natakमानवी भावना इतक्या विलक्षण असतात की त्यांचा तळ शोधणे फारच अवघड असते. मानवी भावनांची ही गुंतागुंत अनादी काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती परस्परांशी वागताना या भावनांचा शोध घेत असतात. मग हे नाते रक्ताचे असो, मित्रत्वाचे असो की आणखी कोणतेही असो. अद्वैत दादरकर यांनी लिहिलेल्या 'फैमिली ड्रामा' या नव्या नाटकात अशाच भावनिक नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असून 'फैमिली ड्रामा' हे नाव सार्थ होईल इतपत तो 'कौटुंबिक' झाला आहे. 'फैमिली ड्रामा' ही जरी एका करमरकर नावाच्या कुटुंबाची 'कथा' असली तरी ती सादर करताना झालेली भावनिक आंदोलने ही इतर कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाची असू शकतात हे दाखविण्यात लेखक अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे चांगलेच यशस्वी झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या 'फैमिली ड्रामा' मध्ये छान रंगून जातो..... read continue