
'नवरा माझा भवरा' या करमणूकप्रधान चित्रपटात विनोदी भूमिकेत हातखंडा असलेले अनेक कलाकार एकत्र झळकणार अहेत. छोट्या पडद्यावरील आपल्या लक्षवेधी अभिनयाने आणि सूत्रसंचलनाने अल्पावधीत नावारूपास आलेला अभिनेता निलेश साबळे या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय त्याच्यासोबत तमन्ना नायर ही अभिनेत्री मराठीत पदार्पण करीत आहे. चित्रपटात त्याच्या सह विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, आनंद कारेकर, सतीश तारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ....अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा