Sunday, April 21, 2013

'टूरिंग टॉकीज' च्या संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा चित्रपट | Movie Review Of Touring Talkies


'टूरिंग टॉकीज'च्या संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा चित्रपट 
Touring Talkies, Trupti BHoir
खेडेगावात जत्रा भरणाऱ्या ठिकाणी तंबूत सिनेमाचे खेळ लावून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या 'टूरिंग टॉकीज' संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा हा चित्रपट चांदी नावाची वयात आलेली मुलगी, स्वत:चा छोटा भाऊ आणि जुगारी, दारुडा बाप अशा कुटुंबाची जबाबदारी, मुलाचा वेष परिधान करून टूरिंग टॉकीजचा, बापाचा व्यवसाय सांभाळत अडथळ्यांची शर्यत कशी पार करते त्याचा हा मागोवा. 
निव्वळ मनोरंजनाच्या अपेक्षेने आलेल्या ग्रामीण प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या तरच तिकीट विक्री भरपूर होऊन पोट भरेल, कर्ज फिटेल हे जाणून मार्केटिंगचे सर्व प्रकार दोन भावंडे चलाखीने हाताळतात. बापाने जुगारात हरल्यावर गहाण टाकलेला तंबू परत मिळविण्याकरता दोघे भावंडे या व्यवसायातल्या राजकारणाला फसवणाऱ्या विरोधकांना कसे तोंड देतात हे प्रभावी पणे मांडण्यात नवनवीन प्रयोग करणारेलेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यशस्वी झाले आहेत. या जुन्या व्यवसायातली बिकट परिस्थिती धडपड वास्तवता त्या मागचा इतिहास जाणून घ्यावा असाच आहे.... चित्रपट परीक्षण वाचा