Thursday, January 27, 2011

'गुंतता हृदय हे' नाटकाचा उद्या २८ जानेवारीला पुण्यात शुभारंभ.

'गुंतता हृदय हे' नाटकाचा उद्या २८ जानेवारीला पुण्यात शुभारंभ.
जुन्या नाटकांना पुन्हा रंगमंचावर आणण्यासाठी सुनिल बर्वेच्या 'सुबक' ने हार्बेरियम द्वारे सुरुवात केली. आणि त्याला यशही मिळाले. त्यानंतर निलम शिर्के आणि आर. डी. सामंत सुद्धा 'बॅरिस्टर' द्वारे यात सामील झाले.

सागर नाईकरे यांचे 'सागर थिएटर' ने 'गुंतता हृदय हे' हे नाटक नव्याने रंगमंचावर दाखल करत आहेत. २८ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. जवळपास २५ वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे. रविंद्र सांभारे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. प्रकाश योजना बाबा पार्सेकर यांनी केली आहे.