गणेश फिल्म्स ऍड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'गोप्या' या मराठी सिनेमाचा मुहर्त "काय असा मी केला गुन्हा, ज्याची शिक्षा मिळाली... " असे बोल असलेल्या गीताच्या ध्वनीमुद्रणाने करण्यात आला. गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या सुमधुर आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले. 'गोप्या' चे दिग्दर्शक राज पैठणकर यांनी या सिनेमासाठी गीत रचना केली असून, कथाही त्यांचीच आहे. संगीतकार किरण-राज या जोडीने या सिनेमाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल यांच्या खेरीज, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ या सिनेमातील गाणी गाणार आहेत. क रोहित वाघ या सिनेमातील गाणी गाणार आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathimovieworld.com