'इचार ठरला पक्का' या चित्रपटाच्या गाण्यांच्या सीडीचे अनावरण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर, शर्मिला ठाकरे, दिग्दर्शक मधुर भंडारकर, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगावकर तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या तसेच निर्मात्या सुनंदा पवार आणि चित्रपटातील कलाकार मंडळी यांचं अभिनंदन केलं. तसेच मधुर भंडारकरांनी चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.