विनोदाचा बादशाह भरत जाधव याच्या घरी मांसाहार साफ वर्ज्य आहे. त्याच्या घरी शाकाहारी जेवणाचा घरंदाज बेत रोज वहिनी आखतात. पण तरी भरतच्याच भाषेत सांगायचे तर रोजच्या या 'घासफूस' जेवणाला तो पार कंटाळलाय. एके दिवशी वहिनींची नजर चुकवून त्याने मांसाहारी जेवणाचा (त्याला भरत 'वशाट' म्हणतो) खास बेत आखला. अनेक दिवसांची 'वशाट' खायची प्रबळ इच्छा पूर्ण होणार म्हणून भरत खुशीत होता. 'वशाट' वर दणकून ताव मारण्याचा जोरदार घाट त्याने घातला. पण दैव देतं आणि कर्म नेतं, अशी गत! 'वशाट'च्या पहिल्या घासालाच चोरी पकडली गेली... आणि 'वशाट' चा डाव 'वशाड' झाला!!