Wednesday, April 13, 2011

माझं चित्रपट आगमन हे थोडं स्पेशल आहे- मीता सावरकर

माझं चित्रपट आगमन हे थोडं स्पेशल आहे- मीता सावरकर
मुंबईच्या विले पार्लेने अनेक उत्कृष्ट कलाकार या चित्रपट्सृष्टीला दिले. टिळक विद्यालय आणि साठे कॉलेज शिक्षणासोबतच गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मीता सावरकर ही ह्याच शिक्षण संस्थांचा एक हिस्सा. जिने जाहिरात क्षेत्रात एक मॉडेल म्हणून खूप नावलौकिक मिळवला आहे. अतिशय उत्कृष्ट अभिनय असलेल्या लोकांची या क्षेत्रात गरज असते आणि मीताने त्या गरजा पूर्ण केल्या. मायक्रोबायोलॉजी या विषयात बी.एससी करत असताना ती अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घ्यायची. गेल्या ५-६ वर्षांपासून ती जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे आणि नेस्टले मिल्की बार, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पू आणि मुव अशा जाहिरातींमुळे तिचा चेहरा घराघरात पोहचला.

स्मिता तळवळकर यांच्या 'घरकुल' या मालिकेतून तिने मराठी मालिकांमध्ये पदार्पण केलं. 'झी मराठी' वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली. तिने त्या मालिकेत एका अशा मुलीची भूमिका साकारली होती जिला मोडेलिंग मध्ये करिअर करायचं आहे. आणि नेमकी ही मालिका तिला मॉडेलिंग मध्ये करिअर सुरु करण्यासाठी लकी ठरली. मीता, हि राजीव पाटिल दिग्दर्शित 'पांगिरा' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तिचा जाहिरात ते चित्रपट असा प्रवास जाणून घेऊया तिच्याकडूनच.